अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
सर्वसामान्यांसह आता बळीराजाला हा पाऊस नकोसा झाला आहे. या पावसामुळे अनेक समस्या व संकटे निर्माण होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात गेली आठवडाभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.
तसेच पाण्याचा वेग पाहता तालुक्यातील रस्ते देखील दिसेनासे झाली आहेत. जोरदार पावसाने नदी, नाले, तालव व विहिरी तुडुंब भरल्या आहेत.
भरपूर पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, पावसाने शेती पिकांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे अति पावसाने तालुक्यातील अनेक गावांचे रस्ते वाहून गेले.
अनेक छोट्या मोठ्या गावांना जोडणारे रस्ते पाण्यात गेले. रस्ता सापडेना यामुळे नागरिकांचे हाल होऊ लागले. दरम्यान याबाबत महसूल विभागाने शेतीचे पंचनामे करावे आणि रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी
सरपंच प्रभाती मोरे व उपसरंपच राजश्री बुचडे यांनी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकविमा मिळावा, त्या साठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करावी.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved