अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणांबाबत न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता सकल मराठा समाज बांधवांमध्ये एक संतापाची लाट उसळली आहे.
आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावे यासाठी समाज बांधव एकटावू लागले आहे.याच पार्श्वभूमीवर आज कर्जत तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे वतीने ठिय्या आंदोलन केले.
मराठा समाजाला आपल्या भावी पिढीला काहीतरी द्यायला हवे आणि ते देणार नसलो तर समाज आपल्याला माफ करणार नाही, त्यामुळे मराठा समाजाने स्वस्थ बसून चालणार नाही,
जागे झाले पाहिजे, असे आवाहन कर्जत सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनिल भोसले यांनी केले. सकल मराठा समाजाचे वतीने आज रायगड जिल्ह्यात तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कर्जत तहसील कार्यालयाबाहेर सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकत्र आले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनिल भोसले, राजेश लाड यांच्यासह ज्येष्ठ वकील गोपाळ शेळके तसेच मनोहर थोरवे,
राजेश जाधव, नितीन सावंत, सोमनाथ ठोंबरे, प्रदीप ठाकरे, ज्ञानेश्वर भालीवडे, सुरेश बोराडे, शाहीर गणेश ताम्हाणे, हरेश घुडे, ऍड. भारती ढाकवळ, प्रमिला बोराडे आदीसह मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved