अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील पत्रकार जितेंद्र आढाव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकार वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते अहमदनगर येथे नियुक्ती पत्र देऊन त्यांची महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार जितेंद्र आढाव हॆ श्रीगोंदे तालुक्यातील नामांकीत पत्रकार असून त्यांनी आत्तापर्यंत वृक्ष लागवड , वृक्षसंवर्धन , प्रदूषण , पर्यावरण जागृती या क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन संपूर्ण भारत देशात नावाजलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली
असल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांनी या निवडी वेळी बोलतांना सांगितले. या निवडी बद्धल पत्रकार जितेंद्र आढाव यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमा वेळी संस्थेचे अहमदनगर येथील तुकाराम अडसुळ , पै. नानासाहेब डोंगरे , शारदा होशिंग , मारुती कदम, अँड. सुवर्णा आंधळे , हेमलता बरमेचा व छाया रजपूत हॆ पदाधिकारी उपास्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved