अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच संगमनेर तालुक्यात एक चोरीची घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथील सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या शाखेमधून सखाहरी विष्णू दुशिंग (रा.जांबुत खुर्द) या वयोवृद्धाने वीस हजार रूपये काढून खिशात ठेवले होते.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून आल्हादपणे हे वीस हजार रुपये चोरून पोबारा केला असल्याची घटना बुधवारी (ता.11) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सखाहरी दुशिंग हे वयोवृद्ध शेतकरी बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास साकूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते.
दरम्यान, खात्यामधून वीस हजार रुपये काढल्यानंतर ते पैसे त्यांनी खिशात ठेवले आणि पासबुक छापण्यासाठी ते गेले. याच संधीचा फायदा उठवत पासबुक छापत असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवून आल्हादपणे त्यांच्या खिशात हात घालून वीस हजार रूपये चोरून पोबारा केला.
याप्रकरणी सखाहरी दुशिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल दशरथ वायाळ हे करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved