देशाचं सोडा पण महाराष्ट्रात पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- राजकारणात येण्यापूर्वी पवार मला मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत.

त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा.. अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही….,

पवार साहेबांसोबत चंद्रकांत दादांनी केलेले वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,’ असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला होता.

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांच्या या ट्विटला जोरदार पलटवार केला आहे.

रोहित पवारांच्या या टीकेवर निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.‘सचिनची तुलना होऊ शकत नाही. सचिन आऊट जरी झाला तरी देशाला त्याच्यावरती विश्वास होता की जे काही करेल ते सचिनच करेल,

देशाचं सोडा पण महाराष्ट्रात पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही. साखर कारखान्यांच्या पलीकडे ज्यांना महाराष्ट्र दिसत नाही त्यांनी बोलू नये,’ असे ट्वीट करत निलेश राणेंनी जोरदार पलटवार केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe