‘त्यांचा’ हिशेब चुकता करू – आमदार निलेश लंके

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पारनेर :- माझी कारकीर्द कलंकित करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा हिशेब चुकता करण्याचा इशारा आमदार नीलेश लंके यांनी या वेळी दिला.अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

मावळचे आमदार सुनील शेळके, मेहबूब शेख, विक्रम राठोड, राणी लंके, दादा शिंदे, सरपंच राहुल झावरे, संजीव भोर, बाबाजी तरटे, विजय औटी, कारभारी पोटघन, कैलास गाडीलकर, तहसीलदार ज्योती देवरे,

अशोक सावंत, राजेेंद्र चौधरी, सरपंच सविता साठे, राजेंद शिंदे, संदीप मगर, नगरसेवक नंदकुमार औटी, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे, जीतेश सरडे, बाळासाहेब खिलारी, सचिन पवार, अरुण पवार या वेळी उपस्थित होते.

लंके म्हणाले, २०१० ते २०१९ या कालावधीत मोठा संघर्ष करावा लागला. १४ खोटे गुन्हे दाखल झाले. ते करणाऱ्यांचा हिशेब आता चुकता करू. जनतेच्या पाठबळावर पुढील विधानसभा निवडणुकीत १ लाखाचे मताधिक्य घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून लवकरच पत्रकार परिषदेत त्याची सविस्तर माहिती जाहीर करू, असे सांगून लंके म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मला आमदार होण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.

तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. विधानसभा निवडणुकीत व्यवहार केला गेल्यामुळे पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होऊ शकला नाही. अलीकडेच पंचायत समिती पदाधिकारी निवडीतही घोडेबाजार झाला. अशा गद्दारांचा हिशेब यापुढील काळात आपण करणार आहोत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment