LIVE Updates : राज्यात लॉकडाऊन नाही वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री…

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री जनतेशी संवाद साधला. 

कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा. माझा विश्वास – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं…..लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं आरोग्य सुविधा सुधारणं म्हणजे फर्निचर उभं करणं नाही, तज्त्ज्ञ डॉक्टर हवेत. लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल

  • डॉक्टर, आरोग्यसेवक यांच्या मदतीसाठी कोरोना विरोधातील लढाईसाठी रस्त्यावर उतरा
  • लॉकडाऊनविरोधात नव्हे तर लॉकडाऊन होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरा
  • कोरोनाच्या काळात राजकारण नको
  • अर्थचक्र आणि जनतेचा जीव वाचवणे या कात्रीत आपण सापडलो आहोत.
  • लॉकडाऊन खूप घातक आहे, याची जाणीव आहे.
  • अनेक देशांनीही कठोर निर्बंध जारी केले आहे.
  • ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, रशिया मधील परिस्थितीही बिकट आहे.
  • अमेरिकेनेही सात कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.
  • रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणताही ठोस उपाय नाही.
  • लस घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
  • लस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • लस घेतल्यानंतरही मास्क घालणे गरजेचे आहे.
  • लसीकरणाची संख्या वाढवत आहोत. ते आता गरजेचे आहे. लसीकरणाची क्षमताही वाढत आहे.
  • इतर सुविधा वाढवता येतील. मात्र, डॉक्टर आणि आरोग्यसेवक कोठून आणणार, हा चिंतेचा विषय आहे
  • रुग्णवाढ अशीच राहिल्यास सध्या असलेल्या सुविधा अपुऱ्या पडतील
  • जनतेच्या जिवाची जबाबादारी आपल्यावर आहे.
  • सध्या रुग्णवाढ झपाट्याने होत आहे.
  • आपण फिल्ड हॉस्पिटल, कोविड सेंटर उभारले, रुग्णांसाठी हे उभारण्यात आले.

परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील :- “आज 45 हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली तर.. विगलीकरणात सध्या 2 लाख 20 हजार बेड्स आहेत. त्यापैकी 1 लाख 37 हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे 65 टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे 20519 आहेत. ते जवळपास 48 टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स 25 टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कुणी व्हिलन ठरवलं तरी माझी जबाबदारी पार पाडेल :- “काहीही लपवत नाही आणि लपवणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थितीत धक्कादायक जरी वाटत असली तरी जे सत्य आहे ते सांगत आहोत. इतर राज्यात वाढ नाही तुमच्याकडे का? या प्रश्नावर उत्तर देणार नाही. मला महाराष्ट्र प्यारा आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कुणी व्हिलन ठरवलं तरी माझी जबाबदारी पार पाडेल. पाडणारच ते माझं कर्तव्य. त्यामुळे घाबरु नका”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील 8 जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात येतील :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील 8 जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लावण्यात येणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe