मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यात व त्याचा मृत्युदर कमी करण्यात चांगले प्रयत्न सुरु आहेत. यूके, इटली आणि जर्मनीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर खूपच कमी आहे.अंदाजापेक्षा मुंबईची आकडेवारी कमी असून, मेअखेरीस ७२ हजार जण बाधित होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
ब्लावतनिक स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने विकसित केलेल्या कोविड-१९ रिस्पॉन्स ट्रॅकरनुसार देशात लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. तथापि, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याने सीमा बंद करणे,
शाळा-कॉलेजे बंद करणे, प्रवासावर बंदी घालणे असे उपाय आधीपासूनच स्वत:हून अंमलात आणलेपरंतु, प्रत्यक्षात हा आकडा ३५ हजारांच्या आताच थांबेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या , हे विशेष असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. यामुळे अंदाजापेक्षाही आज चांगले परिणाम राज्यात दिसत आहेत.
वाढत्या रुग्णांची संख्याबाबत ते म्हणाले आपण मोठ्या प्रमाणावर चाचण्याही करीत आहोत त्यामुळे हे आकडेवारी जास्त वाटत आहे. २ एप्रिलला रुग्ण दुप्पट होण्याचा वेग केवळ तीन दिवस होता. तो आज ११ दिवसांवर गेला आहे.
मुंबईत रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि एप्रिलअखेरीस हा आकडा ६० हजार होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सात हजार रुग्ण होते.
मे अखेरीपर्यंत ७२ हजार रुग्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. प्रत्यक्षात ३५ हजार जणच बाधित होऊ शकतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरोग्य साधनसुविधा वाढवण्यात सरकार यशस्वी ठरले आहे.
सुरुवातीला फक्त तीन अलगीकरण रुग्णालये, एक चाचणी प्रयोगशाळा, ३५० खाटांची सुविधा होती. आज एक हजार ४८४ कोविड केअर सेंटर, दोन लाख ४८ हजार ६०० खाटा, ५७३ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, दोन लाख ४० हजार अलगीकरण (ऑक्सिजनसह) उपलब्ध आहेत.
शिवाय २९० डेडीकेटेड कोविड रुग्णालये, आठ हजार खाटा, दोन हजार ८०० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. आज ६६ प्रयोगशाळांमधून ११ हजार चाचण्या केल्या जातात. दोन लाख ३० हजार पीपीई, चार लाख २० हजार एन-९५ मास्क आपल्याकडे आहेत.
वरळी एनएससी डोम, रेसकोर्स, गोरेगाव नेस्को अशा ठिकाणी एक हजार ३०० पेक्षा जास्त आयसीयु, अलगीकरण खाटांची व्यवस्था केली आहे.
तर सहा हजार खाटांचे नियोजन बीकेसी एमएमआरडीए, सिडको-मुलुंड, दहिसर-मुंबई मेट्रो, वरळी डेअरी येथे केले आहे. याठिकाणी आयसीयु, डायलिसीस, ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था असेल. याच पद्धतीने इटलीने जहाजांवरील कंटेनर्समध्ये तर युकेने चार हजार खाटांचे रुग्णालय लंडन कॉन्फरन्स सेंटर येथे तयार केले आहे, असे त्यांनी सांगितले.