Malawi Mango:- महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. खास करून महाराष्ट्रातील हापूस आंबा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असा आंबा आहे. त्यामुळे आंबा शौकिनांकडून हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
तसेच या परिसरामध्ये हापूस शिवाय इतर अनेक जातींच्या आंब्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते व त्यांना देखील तेवढीच प्रसिद्धी आणि मागणी आहे. परंतु या अनुषंगाने जर आपण मूळच्या दक्षिण आफ्रिकेतील असलेला व रंगाने आणि चवीने कोकणातील आंब्यांसारखाच असणारा मालावी आंबाचा विचार केला तर याने आता उन्हाळ्यामध्ये आंबा शौकिनांची चव भागवणाऱ्या हापूसची जागा घेतल्याचे सध्या चित्र आहे.
हिवाळ्यामध्ये आंब्याच्या चवीचा आस्वाद आता आंबा शौकिनांना घेता येणार असून नुकताच तो पुण्याच्या बाजारपेठेत दाखल देखील झालेला आहे. मालावी जातीच्या या आंब्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तो कोकणच्या हापूस आंब्याप्रमाणेच त्याचा रंग आणि चव देखील असते. बाजारपेठेमध्ये या आंब्याच्या तीन किलोच्या पेटीला दर्जानुसार 2000 ते 3500 रुपये दर मिळत असून किरकोळ बाजारात एक पेटी 2000 ते 2200 प्रमाणे विकली जात आहे.
काय आहे मालावी आंब्याचे वैशिष्ट्ये?
मालावी आंब्याचे वैशिष्ट्ये पाहिले तर या आंब्याची दक्षिण आफ्रिकेतील मालावी देशात एका युरोपियन कंपनीकडून हापूस आंब्याची लागवड केली जाते. विशेष म्हणजे कोकणाप्रमाणेच मालावीतील वातावरण देखील या आंब्याच्या एकंदरीत लागवडीसाठी व वाढीसाठी पोषक आहे.
त्या ठिकाणी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आंबे, केळी तसेच अननस या फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या युरोपियन कंपनीने मालावी मध्ये आंबा लागवड केल्यानंतर सुरुवातीला हापूसची आवक तुरळक प्रमाणात होत होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांचा विचार केला तर मालावी हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
व पाच वर्ष पासून या मालावी हापूसची आयात केली जात आहे. मागच्या वर्षी 90 टन मालावी हापूसची आयात करण्यात आलेली होती. गेल्या आठवड्यामध्ये पहिल्याच टप्प्यात पंधराशे पेटी मालावी हापूसची आवक झाल्याची देखील माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली.
आंब्याचा हंगाम हा 15 ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत सुरू असतो. एका शेतकऱ्याने 2013 ला दापोली येथून हापूस आंब्याचे कलम दक्षिण आफ्रिकेमध्ये नेऊन त्या ठिकाणी मालावी या ठिकाणी 2500 हेक्टर मालावी हापूसची लागवड केली व चार ते पाच वर्षापासून त्याचे उत्पन्न आता सुरू झालेले आहे.