मंत्रालयाच्या आदेशास मनापा कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

Published on -

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर येथील रहिवासी असलेले व सध्या अंबाला येथे भारतीय सैन्यदलात सेवेस असलेले अनिल येणारे यांच्या नगर दौंड रोडवरील हनुमान नगर येथील घरा लगत जागेत तेथील राहावासी लीलाबाई वाघमारे, विजूबाई पांढरे व तुकाराम चौधरी यांनी बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.

येणारे यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यास धोकादायक होईल अशा पद्धतीने घरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले आहे. त्यांच्यावर कारवाई करून बेकायदेशीर अतिक्रमण केलेले बांधकाम पाडण्यात यावे यासाठी गेल्या दीड वर्षापासून अनिल येणारे महानगरपालिकेकडे दाद मागत आहेत.

जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यांनी दाद दिली नाही. त्यानंतर थेट मंत्रालयात तक्रार केल्यानंतर तेथून विचारणा झाल्यावर मनपाने दखल घेतली. उपायुक्त पठारे यांनी अतिक्रमण विभागाला अतिक्रमण झालेले बांधकाम पडण्याचे आदेश दिले.

त्यानुसार 24 सप्टेंबरला पडण्याची कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. मात्र पोलीस बंदोबस्त न मिळाल्याचे कारण सांगत कारवाई स्थगित केली. भारतीय सैन्यदलात सेवा देणाऱ्या अनिल येणारे गेल्या दीड वर्षापासून आपल्या घराच्या समस्यांसाठी झगडावे लागत आहे.

अद्यापही ही समस्या सुटली नसल्याने येणारे यांच्या कुटुंबीयांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देवून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाच्या सुरक्षतेसाठी सेवा देणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबीय ही अशी वेळ आली आहे. जर मनपाने त्वरित हे अतिक्रमण झालेले बांधकाम पडले नाहीतर आम्ही सर्वजण मनपात उपोषणास बसणार आहोत, असे निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe