कोपरगावचा विकास करण्यात नगराध्यक्ष अपयशी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-   नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांतून सर्वसाधारण सभा घेणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी होती. त्यांनी केलेल्या कामाची पावती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावकरांनी दिली.

नैतिक जबाबदारी म्हणून विजय वहाडणे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली. उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांच्या पदग्रहणप्रसंगी कोल्हे बोलत होते.

ते म्हणाले, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय सभेत घेण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या मागणीला केराची टेापली दाखवली. मलिदा कशातून मिळेल याला त्यांनी प्राधान्य दिले.

नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सत्काराचे निमंत्रण दिले, परंतु त्यांनी ते नाकारुन व्यक्तीपेक्षा अहंकार मोठा हे दाखवून दिले.

युआयडीएसएसएमटी अंतर्गत ४९.५ कोटींची योजना केंद्र व राज्य शासनाने मंजूर केली असताना कार्यान्वीत नाही. याचा खुलासा नगरपालिकेने करावा, असे सांगून कोल्हे म्हणाले,

शहराच्या विकास आराखडयात सर्वे नंबर २१० आरक्षण क्रमांक ७९ मध्ये पोलिस स्टेशन व पोलिस ग्राउंडची जागा आरक्षित आहे. आरक्षण क्रमांक ८० हे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे.

खंडपीठात मूळ मालकाच्या बाजूने निकाल झाला आहे. ही जागा नगरपालिकेस खेळाच्या मैदानासाठी आवश्यक आहे, अशी भक्कम बाजू न्यायालयात का नाही मांडली? याचे उत्तर द्यावे असे कोल्हे म्हणाले.

४९ कोटी ५० लाखांची पाणीपुरवठा योजना तातडीने सुरु करा, विस्थापित टपरीधारक खोकाशाॕॅप उभारा, धर्मवीर संभाजी महाराज सर्कलजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत आदींबाबतचे निवेदन मुख्यधिकाऱ्यांना देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment