Mini Tractor Subsidy: सरकार महिला शेतकऱ्यांना देत आहे मिनी ट्रॅक्टरवर 90% अनुदानाचा लाभ! अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा अनुदान

Ajay Patil
Published:
mini tractor subsidy

Mini Tractor Subsidy:- सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी सिंचनाशी संबंधित योजना, पशुपालन संबंधित योजना तसेच कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान यासारख्या योजना खूप महत्वपूर्ण आहेत.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध घटकांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून शेतीशी संबंधित कामे सुलभ आणि सोयीस्कर व्हावीत व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्र सरकारचा विचार केला तर  सरकारच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देखील देत आहे.

सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल उचलले असून या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपकरणे खरेदी करण्यासाठी  जवळपास तीन लाख पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे.

यामध्ये संबंधित बचत गटांना स्वतःचा दहा टक्के हिस्सा भरणे गरजेचे आहे. म्हणजेच एकंदरीत 35 हजार रुपये बचत गटांना द्यावे लागणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे जे काही बचत गट आहेत त्यांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने जसे की रोटावेटर आणि ट्रेलर या सगळ्यांवर 90% अनुदान दिले जात आहे. त्यामुळे नक्कीच या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळत आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील या अटी

1- संबंधित बचत गटातील सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे असून ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

2- या बचत गटांमधील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध  गटाचे असावेत.

3- तसेच या स्वयंसहायता बचत गटाचा अध्यक्ष आणि सचिव देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत.

4- या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने म्हणजेच आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तीन लाख 15 हजार रुपयांचे अनुदान या माध्यमातून मंजूर केले जाते.

5- दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने यामध्ये निवड केली जाणार आहे.

 अशाप्रकारे केली जाईल लाभार्थ्यांची निवड

यासाठी सर्वात अगोदर बचत गट किंवा लाभार्थी सदस्यांनी योग्य पद्धतीने अर्जात तपशील नमूद करून तो अर्ज समाज कल्याण विभागाकडे ऑनलाईन सबमिट करणे गरजेचे आहे. तुम्ही दाखल केलेला अर्ज वैध असेल तर त्या अर्जाची प्रिंट सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाईन सबमिट करावे लागते.

त्यानंतर आलेल्या सर्व वैध अर्जांमधून लॉटरी द्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल. यामध्ये लाभार्थ्यांनी खरेदी केलेले साहित्य आणि वाहनांच्या पावत्या ऑनलाईन जमा करणे, सादर केलेल्या इन्व्हाईसमध्ये विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक, पावती क्रमांक आणि आयटम क्रमांक इत्यादी तपशीलवार माहिती देणे गरजेचे आहे.

तसेच यंत्रांच्या मूळ खरेदीची पावती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. तसेच लाभार्थी बचत गटांनी खरेदी केलेल्या वाहनांचा वाहन परवाना आरटीओ मार्फत ऑनलाईन सादर करावा लागणार आहे. तसेच वाहन परवान्याची मूळ प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

1- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://mini.mahasamajkalyan.in आणि https://sjsa.maharashtra.gov.in/mr वर अर्ज करावा लागेल.

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या संबंधीची संपूर्ण माहिती मिळेल.

 या योजनेच्या अधीकच्या माहितीसाठी तुम्ही संबंधित वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe