अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी आज गुरूवारी महापालिकेकडून शट-डाऊन घेण्यात आले आहे.
आज सकाळी दहा वाजल्यापासून ते उद्या पहाटे तीन वाजेपर्यंत ही दुरुस्ती सुरू राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेने बदल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, देहरे गावासाठी मनमाड राज्य महामार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने कामाला सुरुवात केली.
परंतु मुळाधरण ते विळद पंपींग स्टेशनपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनचा भुयारी मार्ग तयार करण्यास अडथळा निर्माण होत होता.
बांधकाम विभागाच्यावतीने पाईपलाईन स्थलांतरीत करण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला. दरम्यान पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून
जोडणीचे काम उद्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होऊन नगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन टप्प्याटप्प्याने सर्व भागात पाणीपुरवठा सुरळित होईल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आज जोडणीचे काम बाकी होते. तांत्रिक अडचण न आल्यास उद्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळित होईल. पुढील काही दिवसात सर्व भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा नियमित होईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved