अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे फलक साईसंस्थानने लावले. त्याला भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली. संस्थानाच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राह्मण महासंघाने यावर भाष्य केले.
काल काही ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावण्यासाठी फलक तयार केले. याला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे, ग्रामस्थांनी लावलेला एक फलक फडकावून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या भुमिकेस आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
आता अनेक ठिकाणी असे फलक लागणार नेमका कुणाच्या फलकावर आक्षेप घ्यायचा, असा प्रश्न देसाई यांच्या समोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साईसंस्थानने याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी. ग्रामस्थांनी व साईसंस्थानने एकत्र बसून निर्णय घ्यावा.
आपण ग्रामस्थांसोबत आहोत. बाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तयार केलेला एक विनंती फलक त्यांनी हातात धरून फडकविला.
या फलकावर साई दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून किंवा सभ्य पोषाख करून यावे. अशी विनंती करणाऱ्या ओळी लिहील्या होत्या. यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते यांच्यासह विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थीत होते.
जाहिर केल्याप्रमाणे मनसेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा कोते यांनी दहा फलक तयार करून ते शहरात ठिकठिकाणी लावले. उद्या आम्ही शहराबाहेरील स्वागत कमानीवर हा मजकुर असलेला मोठा फलक लावणार आहोत. देसाई यांनी आमचे फलक काढून दाखवावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश
- रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू
- प्रेरणादायी ! ‘ती’चे अफाट कर्तृत्व; नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, आता कमावतेय 30 लाख
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये
- व्यवसायासाठी पाहिजे कर्ज ? ‘ही’ बँक देणार 10000 कोटींचे कर्ज
- ‘असे’ ओळखा आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर आहे
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 10 डिसेंबरपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार !
- आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !