अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- फडणवीस सरकारच्या काळात गाजलेले जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने याबाबत नुकतीच चौकशीचे आदेश दिले आहे.
या चौकशीच्या आदेशावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत नऊ ते साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे
कॅगच्या अहवालानुसार तो पैसा जनतेच्या हितासाठी आणि पाण्यासाठी खर्च झाला असता तर तो वाचला असता यामुळे महाविकास आघाडी सरकारने कोणताही राजकीय हेतू न पाहता वाया गेलेल्या पैशाबाबत एसआयटी स्थापन केली आहे
त्याचा योग्य अहवाल येईल अशी खात्री आ. रोहीत पवार यांनी व्यक्त केली. माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी कॅगने जलसंधारणावर झालेल्या खर्चात भ्रष्टाचार झाला नाही असे मत व्यक्त केले आहे.
फक्त खर्चाची चौकशीसाठी एसआयटी ठाकरे सरकारने नियुक्त केली आहे. भ्रष्टाचाराच्या चोकशीसाठी नाही असे मत व्यक्त केल्यावर आ. रोहीत पवार हे जामखेड दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत विचारले असते त्यांनी वरील उत्तर दिले.
दरम्यान ठाकरे सरकारने या बहुचर्चित योजनेची चौकशी लावली असल्याने एक प्रकारे माजी मुख्यमंत्र्याना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved