मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचा हव्यास …

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- वीज बिलांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला.

राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची आवश्यकता असल्याने ते बेफाम आराेप करत सुटले आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली. ठाकरे यांच्या आराेपात अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फासे पलटण्याचे विधान गांभीर्याने घेत नसल्याचा टाेलाही पाटील यांनी लगावला.जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी परिसंवाद आणि जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी अकाेल्यात आले हाेते.

बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळातील दिलेल्या आश्वासनावर घूमजाव केले.

या मुद्यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला हाेता. यावर ठाकरे यांचे अाराेप गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.