अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- लडाखमध्ये चीनने जो भ्याड हल्ला केला त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली . त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोपनीयतेचे कारण देत सरकारने अनेक ऍपवर बंदी घातली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. मोदी यांनी यासाठी विविध पॅकेजेसच्या घोषणा केल्या.
आत्मनिर्भर घोषणेचे आता परिणाम दिसून येत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारत आणि चीनमध्ये असलेली व्यापर तूट तब्बल 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
चीनला होणारी भारताची निर्यात वाढली असून आयातीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे व्यापार तूट घटल्याचं सांगितलं जात आहे. आयात होणाऱ्या चिनी मालावर डंम्पिंग ड्युटी लावली त्यामुळे आयात घटली आहे.
भारतात चीन विरोधी वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी मालही आयात केला नाही. याउलट भारताची काही क्षेत्रातली चीनला होणारी निर्यात वाढली आहे. भारताची पोलाद निर्यात तब्बल 8 पट वाढली आहे.
त्यामुळेही व्यापार तूट कमी होण्यास फायदा झाला. बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भात आकडेवारी दिली आहे. 2020च्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यानची व्यापार तूट ही 12.6 अब्ज डॉलर्स (93 हजार कोटी) एवढी होती.
2019-20मध्ये याच काळात ही तूट तब्बल 22.6 अब्ज डॉलर्स एवढी होती. याच काळीत निर्यात ही 27 टक्क्यांनी वाढली आहे. आधीच्या वर्षात ही याच काळात निर्यात 9.5 टक्क्यांनी वाढली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved