अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे.
राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राणेंनी केलंय. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल असेही ते म्हणाले.
यापूर्वी त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
काही मंत्रीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता नारायण राणेदेखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून यावर उपचार घेत आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved