गुटखा प्रकरणी पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा; सामाजिक कार्यकर्त्याने केली मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

या अवैध मालाच्या वाहतुकीबाबत ओरड सुरु झाल्यावर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात आली. मात्र आता हीच कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तालुक्यातील एकलहरे शिवारात पकडलेल्या लाखों रुपयांच्या गुटखा प्रकरणातील संशयित मुख्य आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांची चौकशी करुन

नार्को तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांनी केली आहे. यासंदर्भात मकासरे यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना चौकशीच्या मागणीचे निवेदन दिले.

शहर पोलिस ठाणे हद्दीत असलेले एकलहरे शिवारात पोलिसांनी छापा टाकुन 54 लाखांचा गुटखा आणि सुंगधी तंबाखू जप्त केली.

शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. तर दोन संशयीत आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

परंतु गुटख्याची अवैध विक्री आणि साठेबाजी करणारे मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्येने पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट यांनी केलेली कारवाई शंकास्पद असल्याचा सवाल मकासरे यांनी उपस्थित केला आहे.

मकासरे यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनाची प्रत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नाशिक लाचलुचपत विभागाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment