अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज अपक्ष असे २ अर्ज दाखल केले.
पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि नीलेश ज्ञानदेव लंके यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केले. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांनी भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात रामदास शंकर शिंदे यांनी भाजपच्या वतीने दोन अर्ज दाखल केले. तर सुमित कन्हय्या पाटील यांनी अपक्ष एक अर्ज दाखल केला. अकोल्यात ७ जणांनी १० अर्ज नेले. संगमनेरमध्ये ७ जणांनी १७ अर्ज नेले.
शिर्डीत ७ जणांनी ९ अर्ज, कोपरगावात १३ उमेदवारांनी २२ अर्ज, श्रीरामपूरमध्ये १६ जणांनी २१ नामनिर्देशनपत्रे नेली. नेवाशात ६ व्यक्तींनी ६ अर्ज नेले.
शेवगाव मतदारसंघात ९ जणांनी १९ अर्ज नेले. राहुरीत १० जणांनी १२ अर्ज नेले. पारनेरमध्ये ११ व्यक्तींनी १२ अर्ज नेले. नगर शहरात एकूण १० लोकांनी १५ अर्ज नेले. श्रीगोंद्यात आज १० लोकांनी १६ अर्ज नेले.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी