नगर : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली तीस वर्ष विकासापासून वंचित असलेल्या नगर शहरामध्ये उद्योग नगरी उभा करून त्या माध्यमातून तरुणाईला रोजगाराची उपलब्धता करून देण्याचे आपले ध्येय असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक सोनवणे, सरचिटणीस सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक नितीन घोडके, कामगार नेते मोहनराव वाखुरे, स्वप्नील पाठक, सुदाम पाटील, युवक आघाडी शहराध्यक्ष हनिफ भाई शेख, युवक आघाडी महासचिव विनोद गायकवाड, दिलीपराव साळवे, पी. एस. जाधव, जीवन कांबळे, शहर उपाध्यक्ष संदीप गायकवाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर शहरामध्ये चुनावी जुमला सुरू आहे. म्हणून आयटी पार्कच्या नावाखाली त्याठिकाणी आपण खूप मोठा विकास घडवून आणल्याचा आभास निर्माण केला जातोय. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण खूप मोठा विकास केला असा कांगावा केला जातोय.
दुसर्या बाजूला ज्यांना मागच्या तीस वर्षात कंपन्या आणणे तर दूरच, पण आहे त्या कंपन्या पळवून लावण्यात रस होता आशा माजी आमदार यांना रोजगार आणि विकासावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी आजवर केवळ भावनिक राजकारण धन्यता मानली.
एकदा मंत्रिपदाची संधी मिळून देखील त्यांना काही करता आले नाही. आजवर राज्यात मागील तीस वर्षात दहा राज्यात युतीची सत्ता असून सुद्धा त्यांना विकास करता आला नाही. आता पुन्हा निवडून द्या मग मी विकास करतो अशा भूलथापांना बळी पडण्यासाठी नगरकर मतदार काही खुळे नाहीत.
नगर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून सक्षम तिसऱ्या पर्यायाची प्रतीक्षा होती. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तो पर्याय आता शहराला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे निश्चित पणाने नगरकर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मला निवडून देत शहरामध्ये परिवर्तन घडवतील, असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे एकदिलाने किरण काळे यांच्या विजयासाठी काम करणार – डॉ. अशोक सोनवणे
किरण काळे यांची उमेदवारी पक्षाने आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेली आहे. ते उच्च शिक्षित असून त्यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्ते काळे यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून आम्ही सर्व जण त्यांचा एकदिलाने प्रचार करणार आहोत. त्यांचा विजय निश्चित असल्याचे यावेळी डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.