संगमनेर :- स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे.
नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. ‘ते’ थोरात तर आम्ही जोरात असे म्हणत त्यांनी संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच असा विश्वास बोलून दाखवला.

काही दिवसांपूर्वी थोरात यांनी स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे आजच्या सभेत कडाडले. कुणाला कोणती उपमा द्यायची त्यासाठी आपण तितके समर्थ असायला पाहिजे असे ते म्हणाले.
वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवरायांसाठी, प्राणांची बाजी लावली होती म्हणून ते बाजीप्रभू. राजे गडावर पोहचल्यावर त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्याशी तुम्ही स्वत:ची तुलना कशी करता. निवडणुकीच्या तोंडावर यांना वीर बाजीप्रमू आठवले.
थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहे, असं म्हणतानाच ते म्हणाले की त्यांना नाही अब्रू तर मी बोलायला कशाला घाबरू, असे म्हणताच सभास्थळी हशा पिकला. ‘तुमचा नेता बँकॉकला पोहचला आहे, तेव्हा आता तुम्ही निर्धास्त घरी जा’, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते थोरात यांना सणसणीत टोला हाणला.
भाजप संपणार असं लोकसभे आधी वातावरण निर्माण केलं जात होतं. मात्र आम्ही भगव्यासाठी त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि आपलं मजबूत सरकार पुन्हा केंद्रात आणलं, असेही ते म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत 200 च्या पुढे जागा मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या सभांना गर्दी जमतेच मात्र त्यासोबतच जनतेने निर्णय घेतला आहे, महायुती म्हणजे महायुतीलाच निवडून देणार, असेही ते म्हणाले.
संगमनेरमध्ये आपल्या सरकारचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे. पण त्यासाठी आधी पाणी इथे आणू. त्यात फक्त सरकारचं नाही तर विकासाचं प्रतिबिंब दाखवायचे आहे, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
- संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय
- Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!
- आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?
- Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार
- Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही