रोहित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Ahmednagarlive24
Published:

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. आज राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे. या मतदारसंघातून शरद पवारांचे नातू रोहित पवार हे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे असणार आहे.

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित असणाऱ्या शिंदे यांचा पराभव करून राजकारणात जोरदार एंट्री करण्यासाठी रोहित पवार सरसावले आहेत.

तर राजकारणातील बलाढ्य पवार घराण्याला धोबीपछाड देऊन राज्याच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवण्याची संधी मिळविण्यासाठी शिंदे सरसावले आहेत.

दोन्ही उमेदवारांनी संपर्क अभियानासह वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मतदारसंघ ढवळून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी जाहीर सभांमधून ऐकमेकांचे वाभाडे काढत मतदारसंघांचे राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment