नगर :- शहराच्या विकासासाठी केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावाने गेल्या पाच वर्षात भरीव निधीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली आहे. नगरचा विकास हा युतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि आता विधानसभेतही युतीची सत्ता येणार आहे.
त्यामुळे नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून नगरचा विकास होऊ शकतो. आज नगर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर शहराचे महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यालय येथून प्रचारफेरी काढण्यात आली होती. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अभय आगरकर, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा विद्ये,
माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, अर्जुन दातरंगे, सुनिल त्रिपाठी, एल.जी.गायकवाड, गौतम दीक्षित, सचिन पारखी, मिलिंद गंधे, बंडोपंत क्षीरसागर, प्रदीप परदेशी, राजेंद्र घोरपडे, बंट्टी ढापसे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आणि नगरच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारफेरीस परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- जगातील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं?, टॉप-5 यादीमध्ये भारताच्या ‘या’ स्टेडियमचंही नाव!
- अंतराळातून परतल्यानंतर शरीरात काय बदल होतात?, शुभांशू शुक्लाच्या आयसोलेशनमागे आहे मोठं विज्ञान!
- कसोटीत सहाव्या नंबरवरून सर्वाधिक 50+ धावा करणारे टॉप-5 भारतीय फलंदाज!
- Bank Of Baroda कडून 42 लाखांच्या होम लोनसाठी तुमचा मासिक पगार किती हवा ?
- ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ?