अजित दादा म्हणतात ‘अबकी बार आघाडी १७५ पार’

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. काट्याने काटा काढला जातो. सुरुवात त्यांनी केली. आम्ही हा खेळ संपवू, असा इशारा देतानाच ‘अबकी बार आघाडी १७५ पार’ असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सोमवारी दिला.

काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार बोलत होते. भारत भालके आणि शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

ते सर्वात आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते. कालांतराने ते काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांना राष्ट्रवादीची विचारधारा पटली म्हणून आता ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत. पांडुरंग बरोरा आणि त्यांचे वडील पवार यांचे कट्टर समर्थक. मात्र पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment