काष्टी : कुकडी साखर कारखान्यावर प्रशासक नेमावा असा आदेश निघाला होता. त्यावर कोणी कुणाचे पाय धरले आणि काय तडजोड केली याचा भांडाफोड विधानसभा निवडणुकीच्या विजयी सभेत करणार आहे, अशी टिका भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विरोधकांवर केली.
काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे भाजप बुध कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दिलीप गांधी, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, संतोष लगड, अनिल पाचपुते, शहाजी हिरवे, दत्तात्रय कोठारे, भैय्या लगड, दिनकर पंधरकर, सुनील दरेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, मच्छिंद्र कराळे, मनोज कोकाटे, दिलीप रासकर, गणपतराव काकडे आदी उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले, कुकडी साखर कारखान्यावर प्रशासक नेमावा म्हणून न्यायालयात जाण्याची भाषा कोणी केली होती. त्यांचा प्रचार करण्याची वेळ आज कुणावर आली हे जनतेला कळते. मतदारसंघात जर विकास कामांचा डोंगर उभा केला होता तर स्वतः मैदानात का उतरले नाहीत, अशी टीका आमदार जगताप यांच्यावर केली.
कारखाना अडचणीत आला असे ते आता सांगतात. कुकडी कारखान्याविरोधात कोर्टात अहवाल कुणी नेला . प्रशासक बसवा अशी मागणी कोणी केली. कुकडीचा चौकशी अहवाल तयार झाला. त्यावर प्रशासक नेमणूक करा, असा आदेश होता.
त्या प्रकरणात तडजोडी कुणी केल्या, हे सर्व आम्हाला माहित आहे, असे पाचपुते यांनी सांगितले . गांधी म्हणाले, भाजपचे जुने कार्यकर्ते कुणाच्या पैशाला हात न लावता निवडणुकीत काम करतात. त्यामुळे या निवडणुकीत काळजी करण्याचे कारण नाही.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी