अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चितळे रोडवर गळ्यात भगवा पंचा घालून मानाच्या विशाल गणपतीसमोर ढोलवर रिदम धरण्याबरोबरच ते भगवा ध्वज घेऊन देखील नाचले.
आमदार जगताप यांचा हा भगवा रिदम नगर शहरातील आगामी विधानसभा निवडणुकीची वेगळी नांदी ठरू शकते. असे राजकीय धुरींचे बोलबाल आहे.

आमदार जगताप यांच्या गळ्यातील भगवा पंचा आणि हातातील भगवा ध्वज नगर शहरातील राजकारणाचे वेगळे विश्लेषण करण्याचा श्रीगणेशा असल्याची चर्चा रंगली आहे.
जगताप यांची ही कृती शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच चितळे रोडवर झाल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
- तीन वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात अचानक उसळी; तेजीमागची कारणे काय आणि ही वाढ किती काळ टिकणार?
- एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास कडक कारवाई; गोंदिया जिल्ह्यात ७० हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! कोकण रेल्वेकडून गर्दी कमी करण्यासाठी लोकमान्य टिळक,मडगाव विशेष गाड्या सुरू
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २२वा हप्ता; फेब्रुवारीत मिळणार २००० रुपये, आधी पूर्ण करा ‘ही’ कामे
- जळगाव-भुसावळ मार्गे धावणार नवीन अमृत भारत एक्सप्रेस; जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा













