जिल्‍हयातील बारा विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिध्‍द

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादयांच्‍या विशेष संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणेबाबत निर्देशित केले होते.

त्‍यानुसार अहमदनगर जिल्‍हयातील 216 अकोले (अ.ज.), 217 संगमनेर, 218 शिर्ड, 219 कोपरगाव, 220 श्रीरामपूर (अ.जा.),221 नेवासा, 222 शेवगाव, 223 राहुरी, 224 पारनेर, 225 अहमदनगर शहर, 226 श्रीगोंदा व 227 कर्जत – जामखेड या विधानसभा मतदारसंघातील 2019 च्‍या प्रारुप मतदार यादया, पुरवणी मतदार यादया – 1 सह अंतिम मतदार यादया सर्व पदनिर्देशित मतदान केंद्रांच्‍या ठिकाणी, जिल्‍हयातील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांची कार्यालये, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये आणि जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयामध्‍ये दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment