कोपरगाव :- शेजारच्या सर्व तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश होतो. मात्र, कोपरगाव तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती असूनही दुष्काळाच्या यादीतून तो वगळला गेला. आमदारांना तालुक्याची वास्तव स्थिती मांडता आली नाही.
अनेक तालुक्यांना दुष्काळाच्या अनुदानाचा लाभ मिळाला. मात्र, कोपरगावची जनता अनुदानापासून वंचित राहिली. हजारो क्युसेस पाणी जायकवाडीत वाहून गेले, पण गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र विकतचे पाणी घ्यावे लागले.

आमदार उदासीन असल्यामुळे तालुका भकास झाल्याचे टीकास्त्र कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता सोडले.
सोनेवाडी, पोहेगाव, रांजणगाव देशमुख, देर्डे-चांदवड, देर्डे-कोऱ्हाळे येथील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन काळे यांच्या हस्ते पार पडले. ते पुढे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून गोदावरी कालव्याच्या आवर्तनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.
२०१४ पर्यंत तालुक्यात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक आता मुंबईत होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. आवर्तन दिले जात नाही, असे ते म्हणाले.
- फक्त 5 तासांची झोप, दोन वेळचं जेवण आणि…; शाहरुख खानच्या फिट अँड फाईन लाईफस्टाइलचं गुपित उघड!
- अबब ! ह्या 39 मजली इमारतीत तब्बल 30,000 लोक राहतात, कुठं आहे ‘ही’ इमारत, महिन्याचे भाडे किती आहे ?
- नारळ पाणी पिल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 6 पदार्थ, अन्यथा वाढतील भयानक आरोग्य समस्या!
- SBI च्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- कुणालाही भावेल अशी पर्सनॅलिटी! प्रचंड आकर्षक असतात ‘या’ अंकाचे लोक, स्वभाव आणि बोलीने क्षणात जिंकतात कुणाचंही मन