उद्रेक घडवून गुन्हे दाखल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- सक्तवसुली संचालनालयाने राज्य सहकारी बँकेतील अनियमितेबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह तत्कालीन संचालक मंडळ सदस्य व शरद पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला. ‘संबंधित बँकेवर पवार संचालक नाहीत, त्यांनी कोणतेही कर्ज वितरण केले नाही. केवळ त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या संचालकांनी संबंधित कृत्य केल्याचा उल्लेख आहे. यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असेल तर ते चुकीचे आहे.

देशात अनेक विचार आहेत व ते मानणारे अनेक जण प्रत्यक्षात चांगली-वाईट कामे करीत आहेत, त्यामुळे त्याचा दोष संबंधित विचाराला देणे खेदजनक आहे. मोदी-फडणवीस यांचा यातून नेमका काय विचार चालला आहे, हे स्पष्ट होते व त्याचे भविष्यात त्यांना परिणाम भोगावे लागतील’, अशी भावना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात नगरसह पाथर्डी, कर्जत, जामखेड, अकोले, शेवगाव, नेवासे व अन्य ठिकाणी निषेध निवेदन दिली असून, कोपरगाव येथे गुरुवारी असे निवेदन दिले जाणार असल्याचे फाळकेंनी सांगितले.

‘पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करून व राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून उद्रेक घडवून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादा आहे, पण तो आम्ही सफल होऊ देणार नाही’, असेही फाळकेंनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment