जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दुष्काळी भागातील कर्जत- जामखेड या तालुक्यांमधील युवक- युवतींसाठी येत्या ३० ऑगस्ट, २०१९ रोजी भव्य सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळावा होणार असून या मेळाव्यात राज्यातील नामवंत बड्या कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात कंपन्याचे अधिकारी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.
रोहित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात सामाजिक कामांच्या माध्यमांतून सक्रीय आहेत. या भागातील जनतेशी संवाद साधत असताना बेरोजगार युवक- युवतींनी नोकरीची समस्या मोठी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

या प्रश्नावर रोहित पवार यांनी गांभीर्याने लक्ष घालत राज्यातील काही बड्या कंपन्यांशी संपर्क साधत दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बड्या कंपन्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात होणा-या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार येत्या ३० ऑगस्ट रोजी कर्जत शहरातील दादापाटील महाविद्यालय येथे सृजन नोकरी मार्गदर्शन व कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन केले आहे.
सृजन आयोजित रोजगार मेळाव्यात पुणे, मुंबई, सोलापूर, बारामती, अहमदनगर, औरंगाबाद तसेच राज्यातील नामवंत ५० पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या सहभागी होणार असून रिटेल, मॅनुफॅक्चरिंग, बँक, ऑफिस, मार्केटिंग, बँकिंग, केपिओ / बिपिओ, नर्सिंग, फायनान्स आदी क्षेत्रातील कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. युवक- युवतींना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे तसेच अनुभवाप्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- IAS, IPS ते क्लर्क ; आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणाचा पगार किती वाढणार? वाचा डिटेल्स
- अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
- आठवा वेतन आयोग : रंजना प्रकाश देसाई बनल्यात नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा, कोण आहेत देसाई ? पहा…
- वारसदाराची परवानगी न घेता वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकू शकतो का ? कायदेतज्ञांनी दिली मोठी माहिती
- ब्रेकिंग ! सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी मिळाली













