आ.नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर.आर.पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला !

Published on -

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला आर. आर. पाटलांसारखा नवा चेहरा मिळाला असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काढले. लंके यांनी हाती घेतलेल्या पाणीप्रश्नावर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आमदार लंके यांनी रविवारी समर्थकांसह बारामती येथे जाऊन पवार यांचा आशीर्वाद घेतला. पवार यांनी लंके यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले.

तालुक्यात किती पाऊस झाला, ऊस, कांदा, तसेच इतर पिकांची स्थिती काय आहे, बंधारे, तलावांमधील पाणीसाठा किती आहे, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते का, पिंपळगावजोगा, कुकडी कालव्याच्या आवर्तनाबाबत शेतकरी वर्गाच्या काही तक्रारी आहेत का याबाबत पवारांनी लंके यांच्याकडून माहिती घेतली.

पारनेर व नगर हे दुष्काळी तालुके आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, असा सल्ला पवार यांनी दिला. सामान्यांचे प्रश्न सोडवताना अडचण आल्यास मी मार्गदर्शन करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार नीलेश लंके, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके यांनी बारामती येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यावर लंके यांनी तब्बल साठ हजारांचे मताधिक्य मिळवल्याचे ऐकून पवार अचंबित झाले. इतके मताधिक्य मिळेल असे मलाही वाटले नव्हते, असे सांगत त्यांनी लंके यांना शुभेच्छा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News