अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत.

“माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत?
लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.” असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की, पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ दे. पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय.
समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया,” असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सरसकट कर्जमाफीची घोषणा करा !
- महाराष्ट्रातील टॉप १० शाळा जिथे मिळते आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण ! लाईफ होणार सेट…
- राहुरी तालुक्यात ४३ महिला होणार सरपंच, ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण जाहीर
- नवलंच ! ‘हा’ आहे भारताचा एकमेव असा जिल्हा जिथे आहेत दोन देशांचे रेल्वे स्टेशन, वाचा…
- Kajwa Festival 2025 : भंडारदऱ्याच्या काजवा महोत्सवावर नियंत्रण येण्याची शक्यता