पारनेर | मोटारसायकल घसरल्याने आमदार नीलेश लंके किरकोळ जखमी झाले. त्यांनी मंगळवारी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात पायाला झालेल्या जखमेवर उपचार करून घेतले.
आमदार झालो, तरी आपण सामान्य कुटुंबातीलच आहोत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. सोमवारी मतमोजणी सुरू होती, त्यावेळी लंके हे आपल्या घरीच होते.

मतांची आघाडी वाढत असल्याने कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर ते मोटारसायकलीवरून सुप्याला निघाले. काही अंतर गेल्यावर पावसामुळे झालेल्या चिखलात गाडी घसरून लंके यांच्या पायास व हाताच्या बोटांना दुखापत झाली.
त्यावर उपचार करण्यात आल्यानंतर विजयाच्या जल्लोषादरम्यान जखमांवर पुन्हा उपचार करण्यास लंके यांना सवडच मिळाली नाही.
मंगळवारी वासुंदे येथील सभा आटोपल्यानंतर लंके ग्रामीण रूग्णालयात गेले. उपचार घेण्यापूर्वी अन्य रूग्णांची चौकशी करून सुविधा मिळतात का, काही अडचणी आहेत का याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…