अकोले : अकोले तालुका हा निसर्गसंपन्न तालुका असून, पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करणे, त्या स्थळांचा विकास करणे हे काही प्रमाणात झाले असून, भविष्यात ‘अकोले पर्यटन तालुका’ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळवून आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी दिली आहे.
अकोले शहरातील नागरिकांशी वार्तालापप्रसंगी बोलत होते. त्यांनी आज इस्लाम पेठ, खटपट नाका येथे भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, असाका संचालक राजेंद्र डावरे, यशवंत आभाळे,

शंभू नेहे, राहुल देशमुख, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, संतोष घोलप, यादव घोलप, बाळासाहेब आंबरे उपस्थित होते. पिचड पुढे म्हणाले, अकोले तालुक्यात रंधा फॉल परिसर सुशोभित करण्यात आला असून, घोरपडादेवीचे मंदिरही बांधण्यात आले.
परिसरात छोटे-छोटे पूल, घाट, रिलिंग, पॅगोडे, परिसराला जोडणारा रस्ता काँक्रीट करण्यात आला. अभयारण्य परिसरात पाऊलवाटा, स्वछतागृह, निरीक्षण छत्र, पर्यटकांसाठी ओटे बांधण्यात आले आहेत. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी गृह पर्यटन ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
पट्टाकिल्ल्याचे सुशोभीकरण करून तेथे पॅगोडे, प्रवेशद्वार, जाण्यासाठी पाऊलवाट, गडावरील बंधाऱ्यांची डागडुजी करून पाणी अडविण्यात आले आहे. शिवजयंतीला शिवयात्रा सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातही तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्यामध्ये अगस्ती आश्रम, कळसेश्वर मंदिर, केळेश्वर मंदिर, टाहाकारी येथील अंबिकामाता मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्र गडावरील शिव मंदिर, निबरळ येथील अंबिका मातेचे मंदिर अशा तालुक्यातील अनेक मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत विकास करण्यात आला आहे.
तालुक्यात पर्यटन वाढण्यासाठी संधी असल्याने आपला प्राधान्यक्रम याच कामाला असेल. पर्यटन विकास आराखडा तयार करून तालुका पर्यटन तालुका झाला पाहिजे. यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. सर्वसामान्य माणूस, गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, कामगारांच्या विकासासाठी आपण सदैव काम करू, असा विश्वास पिचड यांनी यावेळी व्यक्त केला.
बंधाऱ्यांची डागडुजी करून पाणी अडविण्यात आले आहे. शिवजयंतीला शिवयात्रा सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातही तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने जे प्रयत्न झाले त्यामध्ये अगस्ती आश्रम, कळसेश्वर मंदिर, केळेश्वर मंदिर,
टाहाकारी येथील अंबिकामाता मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, हरिश्चंद्र गडावरील शिव मंदिर, निबरळ येथील अंबिका मातेचे मंदिर अशा तालुक्यातील अनेक मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकासअंतर्गत विकास करण्यात आला आहे.
तालुक्यात पर्यटन वाढण्यासाठी संधी असल्याने आपला प्राधान्यक्रम याच कामाला असेल. पर्यटन विकास आराखडा तयार करून तालुका पर्यटन तालुका झाला पाहिजे. यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. सर्वसामान्य माणूस, गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, कामगारांच्या विकासासाठी आपण सदैव काम करू, असा विश्वास पिचड यांनी यावेळी व्यक्त केला.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ
- वाईट काळ संपणार ! आता ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार
- गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSRDC ने घेतला मोठा निर्णय
- फक्त 9 महिन्यात गुंतवणूकदार झाले श्रीमंत! ‘या’ 5 म्युच्युअल फंड्सनी दिला 15% परतावा…पैसा टाकावा का?













