मुंबई :- राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याचा मान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची शक्यता आहे.
नव्या विधानसभेत हंगामी अध्यक्षपदी सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याच्या निवडीची प्रथा असते ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी विधिमंडळ सचिवालय राज्यपालांना सादर करते व त्यानंतर ते हंगामी अध्यक्षांच्या नावाची निवड करतात.

१४ व्या विधानसभेतील १० ज्येष्ठ सदस्यांची यादी सचिवालयाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. त्यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ म्हणून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील सात वेळा, राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपचे कालिदास कोळंबकर, काँग्रेसचे के. सी. पाडवी हेही सातव्यांदा विधानसभेत आले आहेत.
भाजपचे आमदार व माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची या वेळी सहावी टर्म आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहाव्यांदा विधानसभेत येत आहेत.
- महिलांना ब्युटी पार्लर, दुधाचा व्यवसाय अन किराणा दुकानासाठी मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज ! कशी आहे योजना ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मीशो लिमिटेडचा IPO उद्यापासून खुला होणार
- 2026 मध्ये ‘हे’ 3 बिजनेस बनवणार मालामाल….! कमी गुंतवणुकीत मिळणार लाखोंचा नफा
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट झाला कन्फर्म ? ‘या’ मार्गावर धावणार देशातील पहिली स्लीपर वंदे भारत, रूट पहा..
- महत्त्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येते का ? शासनाचे नियम सांगतात की….













