संगमनेर ;- विधानसभा- निवडणुकीत लोकांसमोर जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे मांडा.आपल्यावर जिल्हयासह राज्याची महत्वाची जबाबदारी असल्याने गावामधील कार्यकर्त्यांनी आप आपसातली मतभेद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे आवाहन करतानाच शेजारील (थोरात) म्हणजे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्द येथे आयोजीत २६ गावांमधील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. दरम्यान बैठकीत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, भाजपा – शिवसेना सरकारने लोकाभिमुख विकास कामे केली. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारवर खूश आहे. आताची परिस्थिती बघता संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस यांना लोक पसंती देत आहे.
शेजारील हे बुडत्या जहाजाचे कॅप्टन असल्याने जिल्हयासह राज्यात आपल्याला भरघोष यश संपादन होणार असून राज्यातील दुष्काळी भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाआपलचं समजवून कामाला लागा.
जिल्हयासह राज्यात युतीचा प्रचार करण्याची माझ्यावर जबाबदारी असल्याने वेळ कमी असल्यामुळे सर्वांपर्यंत पोहचणे अशक्य असल्याने कुटुब प्रमुखांची जबाबदारी ही तुमच्यावरचं आहे. कार्यकर्त्यांनी बुथवाईज काम करा म्हणजे कार्यकर्त्यांना किती सक्षम आहे हे समज घेईल हा कानमंत्र ना. विखेनी शेवटी कार्यकर्त्यांना दिली.
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु
- लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार ! 12,500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 40,00,000 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत आजच गुंतवणूक करा
- Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दर महिन्याला मिळणार फिक्स व्याज