मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात नवे चित्र दिसू लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढती जवळीक ही राजकारणातील नवे समीकरण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांनी दिले.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून रोज नवनवीन वक्तव्य केली जात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशीही चर्चा आहे.
रविवारी सेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना मेसेज केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर अजित पवार यांनी ‘याची सुताराम शक्यता नाही,’ असे स्पष्ट केले. सभागृहाचा सदस्य नसणारी व्यक्ती आजपर्यंत आमदार झाली आहे, असे आपण म्हणालो होतो; पण त्याचा तुम्ही वेगळा अर्थ लावला.
शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाशी संबंध जोडण्यात आला; पण मला तसे म्हणायचे नव्हते, असे अजित पवार म्हणाले.