पारनेर :- घोसपुरी एमआयडीसी अडवणाऱ्याला जाब विचारा : नीलेश लंके नगर तालुका | एमआयडीसी झाली, तर या भागातील गोरगरिबांची मुले नोकरी, धंद्याला लागतील, मग आपल्यामागे फिरायला कोणी राहणार नाहीत.
म्हणून गरिबाला गरीब ठेवण्याच्या घातक हेतूने कार्यसम्राट समजणाऱ्या आमदारांनी नगर तालुक्यातील घोसपुरी एमआयडीसीला खोडा घातला. अशा आमदाराला आता तरुणांनी जाब विचारला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांनी खडकी, (ता. नगर) येथे रविवारी प्रचार सभेत केली.
या वेळी खडकीचे सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठुळे, राजेंद्र कोठुळे, मच्छिंद्र कोठुळे, संजय कोठुळे, हेमंत कोठुळे, नीलेश कोठुळे, सुधाकर कोठुळे, रावसाहेब कोठुळे, आदिनाथ गायकवाड, राहुल निकम, संतोष बहिरट, भाऊसाहेब बहिरट, गोवर्धन कोठुळे, अमृत कोठुळे, भाऊसाहेब कोठुळे, अर्जुन रोकडे, कानिफनाथ रोकडे, राहुल कोठुळे आदी उपस्थित होते.