रोहित पवार यांचं गेल्या वर्षभरातील वागणं पाहिलं तर त्यांच्यात एखादा मुरब्बी राजकरणी दडलेला आहे असे नेहमी जाणवते . त्यांच्या भाषणात वागण्यात बोलण्यात संयमीपण असतो , शरद पवारांची तिसरी पिढी राजकरणात सक्रिय झाली आहे. रोहित पवारांच्या रूपाने या घराण्याला एक नवे युवा नेतृत्व लाभले आहे असे जाणवते.
याचा प्रत्यय आज कर्जत जामखेडकरांना आणि अख्या महाराष्ट्राला आला. विजयी झाल्यानंतर एखादा उमेदवार जल्लोष करतोमी कार्यकर्त्यांसमवेत वेळ घालवतो पण पवारांनी तसेकेले नाही . हेच त्यांचे वेगळेपण आहे. ते पोचले थेट अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे , चौंडीला या मतदारसंघात एक वेगळे महत्व आहे हे पवार जाणतात.त्यांनी अहिल्यादेवींचे दर्शन घेतल्यानंतर पोचले थेट प्राध्यापक राम शिंदे यांच्या घरी !
घरी जाताच अगदी शांततेत त्यांचे स्वागत करण्यात आले . त्यांनी गेल्यागेल्या राम शिंदे यांची विचारपूस केली. अगदी लीलया ते वावरत होते , राम शिंदे यांच्या आईला समोर बघताच रोहित पवार झुकले आणि त्यांनी वाकून नमस्कार केला. ‘आई, आशीर्वाद असुद्या’ असे म्हणून त्यांचा आशीर्वाद मागितला . विरोधकाच्या आईला नमस्कार करून आशीर्वाद नसता घेतला तर ते पवारांचं रक्त कसलं ?
यानंतर राम शिंदे यांनी त्यांचा फेटा बांधून आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र राहू आणि काम करू असे आवाहन त्यांनी रॅम शिंदेंच्या कार्यकर्त्यांना केले आणि तिथून निघाले . राजकीय घरात वाढलेल्या संस्कारांचे प्रतिबिंब आज राम शिंदेंच्या घरी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.