येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  उपसरपंच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, विकास कामांच्या बाबतीत विचारात न घेता निर्णय घेतले जातात.

विकास कामांचा हिशेब दिला जात नाही ही कारणे देत काकणेवाडीचे उपसरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी कि,

काकणेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सात पैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

दरम्यान उपसरपंच बाळासाहेब पवार हे सुजित झावरे यांचे समर्थक मानले जात असून या गटातील दुसऱ्या सदस्याला संधी देण्याचे ठरले असताना राजीनामा न दिल्याने अविेशास ठराव दाखल केला असल्याची माहिती समजली आहे.

अविश्वास ठराव दाखल करताना बाळासाहेब नामदेव वाळूंज यांनी पवार यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसिलदार देवरे यांनी स्विकारला.

आता नव्या पदाधिकाऱ्याची निवड करण्यासाठी २८ सप्टेबर रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment