अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले.
मात्र जामखेड येथे सुरु होत असलेल्या एका कोविड सेंटर बाबत तहसीलदारांना निवदेन देण्यात आले आहे. शहरात खासगी कोविड सेंटर सुरू करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
पण या सेंटरला शासनाने परवानगी देताना आवश्यक सुविधा व जागेची पाहणी करावी. तसेच कोविड केंद्र हे वर्दळीच्या ठिकाणी नसावे, अशी मागणी डॉ. भास्करराव मोरे यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बोलताना डॉ. मोरे म्हणाले कि, तालुक्यात एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. अशा परिस्थितीत तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
मात्र कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी आपण शासन निर्णयानुसार उपलब्ध बाबींची खातरजमा करावी. कोविड सेंटर सुरू करताना सदर ठिकाणी वर्दळ नसावी. तसेच आवश्यक बाबींची पडताळणी करूनच कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved