जुनं ते सोनं… जुन्या टीव्हीची किंमत कोटींमध्ये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  जुनं ते सोनं अशी म्हण आहे, मात्र हि म्हण आजच्या तंत्रज्ञांनाच्या युगात खरी ठरत असलेली दिसून येत आहे.

आजकाल LCD , LED अशा टीव्ही आपण पाहत असतात, मात्र एक काळ होता तेव्हा लाकडी कपाट असलेला टीव्ही बाजरात विक्रीसाठी असायचा, आता तंत्रज्ञानात बदल झाला असून आता हा टीव्ही कोठे दिसत नाही.

मात्र, त्याच टीव्हीला आता सोन्याचे मोल आले आहे. पुणे- मुंबईतील काही लोक शहरासह गावोगाव आता त्या जुन्या टीव्हीचा शोध घेऊ लागले आहेत.

त्याची किमतही ते एक कोटी रुपये सांगत आहेत. त्यामुळे त्या टीव्हीचा कशासाठी वापर होतोय, हे शोधणे गरजेचे आहे. शहरातील काही लोक गावाकडे संपर्क करून जुना कपाटावाला टीव्ही आहे का? अशी विचारणा करू लागले आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागातील लोकही हैराण झाले असून, हा टीव्ही नेमका कशाला हवा आहे, याचा शोध आता काही लोक घेऊ लागले आहेत. त्या टीव्हीतील दोन वस्तू अशा आहेत की त्याची बाजार कोट्यवधीची किंमत आहे, अशी कुजबुज सुरू आहे.

लाकडी कपाटाचे जुने टीव्ही खरेदी करून ते मुंबई येथे विक्री केले जातात. त्यातील दोन कीट काढून घेतल्या जातात. जुने टीव्ही खरेदी करणाची साखळी मुंबईमधून आहे.

टीव्हीमधील त्या दोन किटमध्ये घातक रसायन असावे. त्याचा वापर स्फोटके बनविण्यासाठी होत असावा, असा अंदाज काहींनी वर्तविला आहे.

त्यामुळे जुन्या टीव्ही नेमक्‍या कोण खरेदी करतय आणि त्याचा वापर कशासाठी होतोय, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe