मामा दुचाकी चालवू लागले अन अपघात झाला,माळशेज घाटातील अपघातात ठार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- कर्जुलेहर्या येथून दुचाकीवर डोंबिवलीकडे निघालेल्या राजेश बबन आंधळे (वय ४५, कारवस्ती) यांचा सोमवारी दुपारी माळशेज घाटात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.

त्यांचा भाचा हरेराम संजय माने (वय २०, मानेवस्ती, सावरगाव) गंभीर जखमी झाला. आंधळे हे डोंबिवली येथील शिक्षण संस्थेच्या बसवर चालक होते.

गेल्या आठवड्यात ते कर्जुले हर्या येथे आले होते. त्यांचा भाचा माने याची ३ डिसेंबरला अभियांत्रिकीची परीक्षा असल्याने ते सकाळी परत निघाले.

सावरगाव येथे मामांना भेटून भाचा हरेराम यास सोबत घेऊन ते पुढे निघाले. माळशेज घाटात बोगदा ओलांडून गणपती मंदिराजवळील वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप चालकास वेगावर नियंत्रण ठेवला आले नाही.

पिकअपची (एमएच १४ एचजी १८०१) आंधळे यांच्या दुचाकीस (एमएच ०५ सीएस २२६५) धडक बसली. राजेश यांचे जागीच निधन झाले, तर भाचा गंभीर जखमी झाला. पिकअप चालक वाहनासह पसार झाला.

माळशेज घाट सुरू होईपर्यंत राजेश यांचा भाचा हरेराम दुचाकी चालवत होता. वळणदार घाट असल्याने धोका नको म्हणून राजेश यांनी भाच्यास थांबवून स्वतः दुचाकी चालवण्यास बसले व काही मिनिटांत अपघात झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment