अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर-पाथर्डी रोडवरील मेहकरी (ता. नगर) गावच्या फुलाजवळ घडली.
भिमराव केशव गिरी (रा. बीड, हल्ली रा. केडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नगर-पाथर्डी रोडने भिमराव गिरी दुचाकीवरून नगरकडे येत होते. यावेळी नगरकडून पाथर्डीकडे जाणार्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणार्या दुचाकीला जोराची धडक दिली.
समोरासमोर झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. घटना घडली तेव्हा स्थानिक नागरिकांनी गिरी यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत भिमराव गिरी यांचे भाऊ किशोर भिमराव गिरी (रा. केडगाव) यांच्या फिर्यादीवरून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक व्ही. सोनवणे करत आहे.