रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी हि माहिती दिली आहे

आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बाजार समितीत कांदा लिलाव झाले या लिलावात एक नंबर कांद्याला ४४ रुपयांपासून ५१ रुपये भाव मिळाला असून दोन नंबर कांद्याला ३४ ते ४३ रुपये

तर तीन नंबर कांद्याला २२ ते ३३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे आज रोजी बाजार समितीत १३हजार ३३० कांदा गोण्यांची आवक झाली केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली होती

त्यामुळे भाव गडगडण्याची श्यक्यता मांडण्यात आली होती परंतु पारनेर बाजार समितीत कांद्याला ५१ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

दरम्यान बाजार समितीच्या वतीने सभापती प्रशांत गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि शेतकऱ्यांनी शेतात कांदा विक्री करू नये फसवणुकीची शाक्त असल्याने

बाजार समितीतीच कांदा विक्रीला आणावा तसेच एकदम कांदा विक्रीस न आणता टप्प्या टप्याने कांदा विक्रीस आणावा म्हणजे कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment