अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- देशात सर्वत्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे.
यातच आता जगात ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी मनसेने केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. राज्यात इतर सर्व आस्थापना राज्य सरकारने सुरू केल्या आहे. मात्र प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतला नाही.

यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिर्डीत साईबाबा मंदिर खुले करण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नगर मनमाड महामार्गावरून मोर्चा काढून घोषणाबाजी करत मनसे नेते बाळा नांदगावकरांसह शेकडो कार्यकर्ते प्रवेशद्वार क्रमांक चार लगत जमा झाले होते.
यावेळी आयोजित रॅलीला पोलिसांनी बॅरिगेटींगजवळच रोखले. बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जणांना आत प्रवेश देण्यात आला. साईबाबा मंदिरासमोर नांदगावकर यांनी दर्शन घेत त्यांच्यासह 5 पदाधिका-यांनी संस्थान प्रशासकिय इमारतीमध्ये जावून संस्थानचे मुख्य कार्यकारी आधिकारी के. एच. बगाटे यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले,मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली झाली तर राज्य सरकारच्या तिजोरीतच भर पडणार आहे. तसेच संस्थान कर्मचार्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण साईंबाबांंच्या समोर दंडवत घातले. तसेच या भेटीत साईमंदीर खुले करण्यासाठी तसेच कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, साईमंदीर पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved