अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचे संकट काहीशे कमी झाले त्यानंतर बळीराजाने देखील शेतीचे कामे जोमाने सुरु केली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यास पुन्हा चिंताग्रस्त केले.
हेही संकट पेलावत शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने उसाचे पीक घेतले. मात्र संकटाचा सामना करता करता हतबल झाल्या शेतकऱ्याला महावितरणच्या चुकीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी विजेचे शॉर्ट सर्किट झाल्याने चार एकर उस जळून खाक झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत भानुदास भिसे व बापूराव भिसे यांची शेतजमीन आहे.
त्या शेतजमिनीत दोन्हीही भावांनी उसाची लागवड केली होती.उसतोड चालू असताना शेताच्या वरून जाणाऱ्या विजेच्या तारांमध्ये घर्षण शॉर्टसर्किट झाले,
व बघता बघत आगीचे गोळे खाली पिकावर पडल्याने उसाने पेट घेतला. घटनास्थळी आग विजवण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे बघता बघता सर्व उस डोळ्यासमोर जळून खाक झाला.
दरम्यान सणासुदीच्या काळात शेतकऱ्यावर आलेले हे मोठे संकट पाहता संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved