लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.

या मागण्यांबाबत खासदारांना निवेदन साई संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणे संस्थान आस्थापनेवर घ्यावे. कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात मागे घ्यावी.

केंद्र सरकारप्रमाणे संस्थान कर्मचाऱ्यांच्या ग्रच्युईटीबाबत निर्णय करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन कामगार संघटनेतर्फे डॉ. विखे यांना देण्यात आले.

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना गेल्या तीन महिन्यांपासून वेळ नाही. आठ दिवसांत वेळ दिला नाही, तर समिती सदस्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू.

येत्या महिनाभरात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थकारणाला चालना देण्यासाठी साई मंदिर खुले करू. असे विखे म्हणाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe