अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य अद्यापही शाळा बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच या काळात शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.
मात्र विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी वसुल करणार्या खासगी शाळांबाबत पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू एका कार्यक्रमा निमित्त शहरात आले असता पालकवर्गाने त्यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील एका नामंकित खासगी शाळेच्या व्यवस्थापनाबरोबर पालकांचा शालेय वाढीव फी संबधी संघर्ष सुरू आहे.
सर्व फी नाही भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करु असा इशारा शालेय प्रशासनाने पालकांना दिला होता. पालकांच्या तक्रारीवरून या खासगी शाळेवर शिक्षणाधिकारी यांनी त्रिस्तरीय समिती नेमली आहे.
या समितीने पालकांकडून करण्यात येत असलेल्या अवाजवी फी वसुली संदर्भात त्वरीत आपला अहवाल सादर करुन शालेय प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आले.
आमदार बच्चूभाऊ कडू यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर प्रश्न मार्गी लावून पालकांना दिलासा देण्याचे सुचना केल्या.
यावेळी पालक अंतू वारुळे, रामदास ससे, अंकुश गिते, रोमेश बेलेकर, झेबा मुजावर, दीपक चांदणे, नितीन शिंदे, वैभव भोराडे आदी पालक उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved